*ब्युरो न्यूज. :*
चंद्रयान 3 चे चांद्रभूमीवर यशस्वी लैंडिंग… अवघ्या भारतदेशाला तीव्र उत्सुकता असलेल्या चंद्रयान 3 ने अखेरीस अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे चंद्रयान चंद्रावर नियोजित कार्यवाही नुसार उतरले आणि इस्रोच्या परिसरातच नव्हे तर सा- या भारतीयांनी कडकडून टाळ्या वाजवत आनंदोत्सव साजरा केला. श्री. पी. मुथुवेल यांनी आपल्या नेतृत्वाखाली सहका-यांसोबत ही मोहीम यशस्वी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रो सह सा-या भारतीयांचे अभिवादन केले आहे. भारताच्या या मोहिमेमुळे इतर देशांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल असा विश्वास मा. पंतप्रधानांनी व्यक्त केला…