चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग चे कणकवलीकर झाले साक्षीदार

चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग चे कणकवलीकर झाले साक्षीदार

*कोकण Express*

*चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग चे कणकवलीकर झाले साक्षीदार*

*आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवलीच्या मुख्य चौकात झाले थेट प्रक्षेपण*

*चांद्रयान ३ चंद्रावर उतरतात देशभक्तीपर घोषणा देत शास्त्रज्ञ आणि पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन*

*फटाक्याची आतशबजी करत व्यक्त केला आनंद ; देशभक्ती ने भारावले कणकवलीकर..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

चांद्रयान -3 च्या लँडिंग चे थेट प्रक्षेपण कणकवली शहर व परिसरातील नागरिकांना पाहता यावे आणि देशाच्या या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे चांद्रयान लँडिंग चे थेट प्रक्षेपण दाखविले. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कणकवली परिसरातील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाले होती.विद्यार्थी, पालक ,शिक्षक, यांच्यासह अनेक महिला भगिनी या क्षणाच्या साक्षीदार बनल्या. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्याचप्रमाणे व्यापारी,विविध क्षेत्रातील मान्यवर हा चांद्रयान 3 चा सोहळा पाण्यासाठी आले होते. चांद्रयान ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँड होताच भारत माता की जय …..! वंदे मातरम….! अशा घोषणा देत कणकवली चा परिसर देशभक्तीने भारावून गेला. तरुणाईने घोषणा दिल्या तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाकांची आतषबाजी करत चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
चांद्रयान ३ चे सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर लँडिंग होणार होते हा क्षण पाहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असतो तो अभिमान कणकवलीकरांना मिळावा एकत्रितपणे हा क्षण पाहता यावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील मुख्य चौकात या लँडिंग चे थेट प्रक्षेपण दाखवले. यावेळी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , कणकवली तालुका भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉक्टर सुहास पावसकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेविका मेघा गांगण, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, जिल्हा भाजपा प्रसिद्धीप्रमुख समीर प्रभुगावकर,माजी नगरसेवक बंड्या गांगण,सुशील पारकर,निखिल आचरेकर,सुभा मालडकर, युवक जिल्हा पदाधिकारी पपू पुजारे युवक शहराध्यक्ष गणेश तळगावकर,उमेश घाडी, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,श्री पाटील, शाम दळवी,भाई काणेकर, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रयान लँड झाल्यानंतर लाडू वाटप करण्यात आले आणि आनंद व्यक्त करण्यात आला.
बॉक्स
*आमदार राणे यांनी कणकवलीकरांना या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार केले; डॉ. पावसकर*
भाजप नेते, आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेमुळेच आज मुख्य चौकात चांद्रयान ३ चे लँडिंग भव्य अशा मोठ्या स्क्रीनवर पाहता आले. विद्यार्थी आणि नागरी हे प्रक्षेपण पाहण्यासाठी एकत्रितरित्या कणकवली सारख्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येणे आणि सर्वांनी मिळून या क्षणाचे साक्षीदार होणं ही फार गरजेची गोष्ट होती आणि ती आमदार नितेश राणे यांनी केल्याबद्दल मनस्वी समाधान वाटते अशी प्रतिक्रिया रोटरीयन आणि प्रसिद्ध डॉक्टर सुहास पावसकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!