सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी किशोर तावडे

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी किशोर तावडे

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी किशोर तावडे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता के मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली, त्या रिक्त पदी किशोर तावडे यांची नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे. मुंबई येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक या पदावर किशोर तावडे सध्या कार्यरत होते. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर देखील त्यांनी काम केले आहे. १९९५ मध्ये परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रुजू झाले होते. २००० ते २००२ या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी सेवा बजावली. २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. त्यामुळे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!