*कोकण Express*
*आडाळी एमआयडीसी प्रश्नांबाबत लॉंगमार्चला उस्फुर्त प्रतिसाद!!!*
दोडामार्ग सुहास देसाई राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आडाळी एमआयडीसी बाबत आडाळी ते बांदा असा लॉंगमार्चला आज सकाळी सुरुवात करण्यात आली हे आंदोलन प्रतीकात्मक मंत्रालयाच्या दिशेने जायला निघाले असून अनेक उद्योग येऊन स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी युवक महीला कडून जोरदार घोषणा देत बांदा ते दोडामार्ग रस्ता पुर्णपणे गर्दीने फुलला होता अनेक जण यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या फक्त रोजीरोटी भाकरीचा प्रश्न असल्याने जन भावना शासनकर्त्या पर्यंत पोहचवा हाच उददेश असल्याने मोठ्या प्रमाणात आडाळी स्थानिक कृती समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते यामध्ये आडाळी सरपर पराग गावकर, प्रविण गावकर, सतीश लळीत सह माजी आमदार राजन तेली संजू परब जिल्हा बँक संचालक महेश सारंग, राजेद्र म्हापसेकर एकनाथ नाडकर्णी भाजप तालुका अध्यक्ष सुधिर दळवी चद्रकांत मलीक, प्रकाश गवस आदीसह तालुक्यातील सरपंच उपसंरपच, सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते
या लोगमार्च कृती समितीचे अध्यक्ष पराग गावकर सचिव प्रविण गावकर घुगुरगाठी संस्थेचे अध्यक्ष सतिश लळीत आदी उपस्थित ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी व्हावी यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. नारायण राणे यांनी सन २०१३मध्ये मजुरी दिली त्यानंतर म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही याबाबतीत आम्हीं स्थानिकांनी आवाज उठविला त्यांनतर प्रशासनानं बैठका घेऊन काही बाबतीत निर्णय घेतले तसेच वेळोवेळी आश्वासने देऊन फसवणुक केली त्यामुळे या भागात उद्योग आले नाही दहा वर्षात म्हणावा तसा विकास व कामांना प्राधान्य देण्यात आले नाही त्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकली नाही त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन तालुक्यातील रोजीरोटी व भाकरी चां प्रश्न असल्याने मोठा प्रतीसाद तालुक्यात युवकांतून मिळत आहे गेली चार वर्षे प्रशासन मंत्री महोदय बैठका घेऊन फक्त आश्वासने दीलेली हवेत विरली आहे लॉंगमार्च हा पहिला टप्पा असल्याने मोठा वर्ग सहभागी झाला होता रोजगाराचा प्रश्न भेडसावत असल्याने युवक महीला जेष्ठ नागरिक ग्रामस्थ सहभागी झाले होते