चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्याचे बिगुल वाजले

चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्याचे बिगुल वाजले

*कोकण Express*

*चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्याचे बिगुल वाजले*

*स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उदघाटन*

*अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांसह मान्यवरांची उपस्थिती*

*सिंधुदुर्ग :*

सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाच्या उदघाटन सोहळ्याचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य शासनाकडून या उदघाटन सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका निश्चित झाली असून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या चिपी विमानतळाचे काम पूर्णत्वास जात असून जानेवारी महिन्यात विमानतळाचे उदघाटन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले होते. अलीकडे भाजपा नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदींनी विमानतळाला भेट देऊन येथील कामाची पाहणी केली होती. विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाला आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या होत्या. अखेर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला या विमानतळाचे उद्घाटन सोहळा आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड यांनी घेतला आहे. या विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री आदित्य तटकरे, खासदार नारायण राणे, खासदार सुरेश प्रभू, माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुढी, खासदार विनायक राऊत, आमदार बाळाराम पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, जिल्हाधिकारी ​के. ​मंजूलक्ष्मी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अन्बलगन, आयआरबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी केले आहे​. ​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!