गाबीत फिशरमन फेडरेशन च्या स्थापनेसाठी मालवण येथे बैठकीचे आयोजन

गाबीत फिशरमन फेडरेशन च्या स्थापनेसाठी मालवण येथे बैठकीचे आयोजन

*कोकण Express*

*गाबीत फिशरमन फेडरेशन च्या स्थापनेसाठी मालवण येथे बैठकीचे आयोजन*

*विष्णू मोंडकर संयोजक गाबीत फिशरमन फेडरेशन*

गाबीत समाज प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 121 किलोमीटर किनारपट्टीवर राहत असून 25000 पेक्षा जास्त कुटूंबे सागरी किनारपट्टीवर राहत असून राज्याची राजधानी मुंबई व मुंबई उपनगर मध्ये हा समाज वास्तव्यास आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ला,मालवण,देवगड या तालुक्यातील किनारपट्टीवर या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी हा असून या प्रमुख व्यवसायामध्ये हा समाज कार्यरत आहे महाराष्ट्र राज्यांच्या गोवा ,कर्नाटक,गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर हा समाज असंघटित रित्या विखरून वास्तव्यास आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये प्रमुख असलेला हा समाज देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या सागरी किनारपट्टी आजही देशसेवेसाठी प्रतिबद्ध आहे.गाबीत समाजाच्या मासेमारी मुळे देशाच्या परकीय चलनात वाढ होत असताना मात्र हा समाज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मूलभूत गरजांसाठी प्रशासकीय पातळीवर धडपडत आहे.गाबीत समाजाच्या सहकार ,आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक,
आरोग्य,
सीआरझेड,सागरी बंधारे ,रापण व्यावसायिकांचे प्रश्न ,ब्रेक वॉटर प्रकल्प,फिश प्रोसेसींग युनिट ,गाबीत समाज भवन ,फिशरमन कल्चर सेंटर ,सरकारी जागेत राहत्या व्यवसाय ,घराच्या जागेचा प्रश्न,मच्छिमार महिलांचे प्रश्न,मासे विक्री करताना असुविधा ,गाबीत समाजासाठी केंद्र व राज्य सरकारच्या शासनाच्या अनेक आर्थिक योजनांमध्ये गाबीत समाजावर होणारा अन्याय दरवर्षी मच्छिमार बंदरे ,बंधारे योजनेसाठी मंजूर झालेला अखर्चित राहाणारा निधी ,तसेच प्रामुख्याने गाबीत समाजाच्या जात पडताळणी प्रश्न अश्या अनेक विषयावर हा समाज अनेक वर्ष संघर्ष करीत आहे .या साठी गाबीत समाजाच्या या समस्या सोडविण्यासाठी समाजाच्या अनेक संघटना कार्यरत आहेत परंतु वरील सर्व विषयी संघटीत पणे काम होण्यासाठी एका संघटनेची गरज असून नव्याने स्थापन होणारे फेडरेशन समाजाच्या विविध संघटना व्यक्ती यांना सोबत घेऊन काम करणार असून अश्या सर्व विषयी नियोजित पद्धतीने काम करण्यासाठी मंगळवार दिनांक 22/8/23 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल श्री महाराज पेट्रोल पंप नजीक मालवण येथे गाबीत फिशरमन फेडरेशन स्थापन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीसाठी मच्छिमार ,संस्था चालक,गाबीत समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजाच्या व्यक्तीने उपस्थित रहावे अशी विनंती फेडरेशन संयोजक श्री विष्णू मोंडकर व श्री संजय खराडे यांनी केले आहे .

l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!