*कोकण Express*
*वसुंधा वंदन उपक्रमांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या वतीने परिसरात वृक्षारोपण*
*अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोपांच्या संवर्धन व संगोपणाची घेतली जबाबदारी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी समारोपातर्गत देशभर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत असलेल्या वसुधा वदन उपक्रमांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यानी वृक्षारोपण करत त्या रोपाच्या संवर्धन व संगोपणाची जबाबदारी घेतली.
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या आवारात गुरुवारी सकाळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर माजी सैनिक व पंचायत समितीचे कर्मचारी असलेल्या रुजाय बारेत, महेश गावडे यांचा पंचायत समितीतर्फे सन्मान करण्यात आला. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या परिसरात रायवळ आंबा, काजू, सुपारी, नारळ, आवळा, कडुलिंबू, पेरू, बदाम अन्य देशी झाडांचे रोपण केले आणि प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने लावलेल्या रोपट्याच्या संवर्धन व संगोपनाची
जबाबदारी घेतली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक रोपट्याचे जीओ टॅगिंग देखील करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, एकात्मिक बाल विकास विभागाच्या अधिकारी उमा हळदवणेकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे, सुनील पागम, रवी मेस्त्री, प्रमोद ठाकूर, सतीश जाधव, कक्ष अधिकारी अनिल चव्हाण, अधीक्षक मनीषा देसाई, चंद्रसुभाष परब, पी. एन. गुरसाळे, आर. पी. सुतार, गणेश कडुलकर, सुप्रिया सावंत, धानू धुरी, श्रीमती देवरुखकर यांच्यासह पं. स. चे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते…