*कोकण Express*
*आता माझा फोकस ठरला :- भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे*
*कुडाळ : प्रतिनिधी*
आता माझा फोकस ठरलेला आहे कुडाळ आणि मालवण तालुक्याच्या सीमा पुरती काम करायचं विरोधक काय बोलतात काय करतात त्यापेक्षा माझा पक्ष कसा वाढेल याकडे मी लक्ष दिले आहे असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले तसेच यावेळी त्यांनी सांगितले की गणेश चतुर्थी पूर्वी चाकरमान्यांसाठी महामार्ग सुस्थितीत करण्यात येईल यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नांना आमची साथ आहे असे त्यांनी सांगितले.
भाजपचे कुडाळ मालवण प्रमुख निलेश राणे यांनी कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की सध्या मी कुठेही आजूबाजूला बघत नाही विरोधक काय बोलतायत काय करतात याच्याशी माझा संबंध नाही सध्या मी कुडाळ व मालवण या गावांच्या सीमांपूर्वी काम करत असून हे गाव मी फोकस केले आहेत निष्क्रिय आमदार वैभव नाईक यांच्या बद्दल काहीही बोलू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
महामार्ग होणार सुखकर
महामार्गाचा प्रश्न ज्वलंत असला तरी यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे हा मार्ग गणेश चतुर्थी पूर्वी सुस्थितीत करण्यासाठी कार्यतत्पर आहेत. स्वतः महामार्गावर उतरून ते काम करून घेत आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे की पालकमंत्री रवींद्र चव्हाण जे हातात काम घेतात ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि त्यांना आमची ही साथ आहे कोणत्याही परिस्थितीत चाकरमान्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेणार आहोत.