*कोकण Express*
*भाजपाच्यावतीने कुडाळात होणार ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी:- भाजप नेते निलेश राणे यांची माहिती*
*कुडाळ प्रतिनिधी*
भारतीय जनता पक्षाच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी दहीहंडीचे आयोजन कुडाळ शहरातील नवीन एस. टी. बस आगार येथे करण्यात आले असून या दहीहंडीसाठी ५ लाख ५५ हजार ५५५ एवढे मोठे बक्षीस असून दहीहंडीसाठी सिने कलाकार येणार असल्याचे भाजपचे कुडाळ व मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी कुडाळ येथे सांगितले यावेळी सिंधुदुर्ग राजाच्या मंडपाचा शुभारंभ भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.
भाजप कार्यालय येथे दरवर्षी सिंधुदुर्ग राज्याची प्रतिष्ठापना केली जाते या प्रतिष्ठापने पूर्वी सिंधुदुर्ग राजाचा मंडप उभारला जातो आज (गुरुवारी) सिंधुदुर्ग राजाच्या मंडपाचा शुभारंभ कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, उद्योजक विशाल परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश कानडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम तसेच सर्व नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले की गणेश उत्सवाबरोबरच कुडाळ शहरांमध्ये दहीहंडी लाख ५५ हजार ५५५ रुपयांची ही दहीहंडी असणार असून शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी या दहीहंडीचे आहे करण्यात आले आहे. ही दहीहंडी कुडाळ शहरातील नवीन एस. टी. बस आगार येथे आयोजित करण्या यासाठी सिने अभिनेते भाऊ कदम, मानसी नाईक, देवदत्त नेगे, प्राजक्ता माळी तसेच अन्य कलावंत उ राहणार आहेत. असे माजी खासदार, भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले.