*कोकण Express*
*अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कळसुली प्रशालेमध्ये देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा संपन्न*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभात घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत गीत गायन स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक- इयत्ता सातवी तर द्वितीय क्रमांक – इयत्ता सहावी तृतीय क्रमांक – इयत्ता पाचवी तर माध्यमिक उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक- इयत्ता अकरावी तर द्वितीय क्रमांक- इयत्ता नववी तृतीय क्रमांक- इयत्ता आठवी यांनी पटकावले.
चंद्रशेखर महादेव दळवी (कळसुली शिक्षण संघ उपकार्याध्यक्ष ) प्रायोजित घेण्यात आलेल्या स्पर्धेतील स्पर्धकांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस वितरित करण्यात आले. या कार्यक्रमांच्या वेळी स्कूल कमिटी चेअरमन के.आर. दळवी, व्हॉइस चेअरमन स्कूल कमिटी- नामदेव घाडीगावकर,अंकुश परब- कळसुली शिक्षण संघ कार्यकारणी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- शिवाजी गुरव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य- शिवप्रसाद घाडीगावकर, प्रभाकर दळवी- शिक्षक पालक संघ सदस्य, सौ.श्वेता दळवी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, राजेंद्र प्रसाद मणेरीकर- केंद्रप्रमुख जयवंत कुलकर्णी उर्फ भाई गुरुजी, हेमंत कुमार परब, सौ.दर्शना ठाकूर इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही व्ही वगरे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश आणि स्वरूप स्पष्ट केले. मुलांच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन प्रशालेमध्ये दरवर्षी करण्यात येते असे त्यांनी प्रास्ताविक पर भाषणात सांगितले.
अध्यक्षीय भाषणात के,आर, दळवी यांनी मुलांना देशासाठी सुजाण नागरिक होण्याचे आवाहन करत आपण विद्यार्थीदशेत सुद्धा देशासाठी अनेक गोष्टी करू शकतो याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. स्पर्धत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. पी. पवार यांनी केले तर परीक्षण एस. के. सावळ, एस. एल.आर्लेकर आणि एस ए.परुळेकर यांनी पाहिले.या कार्यक्रमासाठी वाद्यवृंदा मध्ये हार्मोनियम प्रशालेचे विद्यार्थी हेमंत मेस्त्री, रूद्र गुरव, ढोलकी वादक वेदांत गोसावी तसेच तबला गणेश मेस्त्री, गौरव मेस्त्री, हर्षद घाडीगावकर, दर्शन सावंत, हर्ष दळवी यांची साथ लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.चैत्रा चव्हाण यांनी केले. यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या वर्ग शिक्षकांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही.व्ही. वगरे,ज्येष्ठ शिक्षक एस. के.सावळ व शिक्षक-पालक संघ, ग्रामस्थ वर्गातून करण्यात आले.