*कोकण Express*
*नेरूर गावातील अनैतिक धंदे बंद करण्याची महिला वर्गाची मागणी*
*कुडाळ पोलीस निरीक्षक रूनाल मुल्ला यांना दिले निवेदन..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील नेरूर गावामध्ये अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे गावातील तरुण वर्ग अनैतिक धंद्याद्वारे बेधुंद होऊन गावातील महिलांना त्रास देण्याचा प्रकार सध्या चालू आहे. एका महिलेला देखील नाहक त्रास सहन करावा लागला आहे. नेरूर ग्रामपंचायत येथे महिलांची ग्रामसभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. यापुढे कुठल्याही महिलेवरती असा प्रकार घडू नये तसेच नेरूर गावामध्ये सध्या चालू असलेले दारू व्यवसाय आणि इतर व्यवसाय लवकरात लवकर बंद व्हावेत, असा ठराव आजच्या ग्रामसभेत झाला. आणि सर्व महिलांनी एकत्र येत कुडाळ पोलीस निरीक्षक रुमाल मुल्ला यांची भेट घेत या सर्व विषयावरती चर्चा केली. त्यांना निवेदन सादर केले. पोलीस निरीक्षक रुनाल मुल्ला यांनी सर्व महिलांशी चर्चा करत लवकरच आपण याविषयी दोशींवर काडक कारवाई करून महिलांना होणारा त्रास आणि नेरूर गावामध्ये चालू असलेले अनैतिक धंदे लवकरच बंद करण्यात येतील असं आश्वासन कुडाळ पोलीस निरीक्षक रूनाल मुल्ला यांनी दिले..