विजयदुर्ग किल्यावर सिंधुरत्न समृद्धी योजना समिती आणि ग्रामपंचायत विजयदुर्ग यांच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने हेलियम डे साजरा

विजयदुर्ग किल्यावर सिंधुरत्न समृद्धी योजना समिती आणि ग्रामपंचायत विजयदुर्ग यांच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने हेलियम डे साजरा

*कोकण Express*

*विजयदुर्ग किल्यावर सिंधुरत्न समृद्धी योजना समिती आणि ग्रामपंचायत विजयदुर्ग यांच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने हेलियम डे साजरा*

सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्यावर १८ ऑगस्ट १८६८ रोजी वातावरणातील हेलियम वायूचा शोध लागला. आज या घटनेला १५५ वर्षे होत आहेत. हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटकांबरोबरच आता अभ्यासकांनाही साद घालीत आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने सिंधुरत्न समृद्धी योजना समिती आणि ग्रामपंचायत विजयदुर्ग यांच्या वतीने गेली अनेक वर्षे हेलियम डे साजरा केला जात आहे.
18 ऑगस्ट आज विजयदुर्ग किल्ल्यावर ‘साहेबाचे ओटे’ या ठिकाणी ‘ हेलियम डे’ साजरा करण्यात आला. दिवस ” हेलियम डे’ म्हणून साजरा करण्यामुळे याविषयी जागृती वाढली. ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विविध मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करून ” हेलियम डे’ साजरा केला. यामुळे आज या ऐतिहासिक किल्ल्यावर विज्ञानप्रेमींची गजबज वाढली. सिंधुदुर्गातील सर्वात प्राचीन जलदुर्ग म्हणून किल्ले विजयदुर्ग कडे पाहिले जाते.

जगभर १८ ऑगस्ट हा दिवस “जागतिक हेलियम दिन”म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने विजयदुर्ग किल्ल्यावर “वर्ल्ड हेलियम डे”चा कार्यक्रम आयोजित केला होता. “वर्ल्ड हेलियम डे” या दिवसाचे आणि कोकणचे एक आगळे नाते आहे. ते म्हणजे, हा जो हेलियम वायू आहे, त्याचा शोधच मुळी विजयदुर्ग किल्ल्यावर लागला आहे. १८ ऑगस्ट १८६८ या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होते आणि ते पाहण्यासाठी सर नॉर्मन लॅकियर या ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञाने जाणीवपूर्वक विजयदुर्ग किल्ल्याची निवड केली होती. त्याने ते खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी विजयदुर्ग किल्ल्यावर विशिष्ट ठिकाणी दुर्बिण लावली होती आणि सूर्यग्रहणाचे निरिक्षण करीत असतांनाच त्यांना हेलियमचा शोध लागला. सर लॉकीयर यांच्या मते त्यादिवशी होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्याकरीता विजयदुर्ग किल्ला हे जगभरातील सर्वात योग्य स्थळ होते. जेथून सूर्यग्रहण व्यवस्थित अभ्यासता येईल व जे स्थान ग्रहणदर्शन/अभ्यासाकरीता ग्रहणरेषेच्या मध्यबिंदूवर असेल असे होते. किल्ले विजयदुर्ग, अक्षांश/रेखांश यांचा विचारपूर्वक अभ्यास केल्यावरच सर लॉकीयर यांनी या किल्ल्याची ग्रहण अभ्यासाकरीता निवड केली होती. लॅकियरने ज्या ओट्यावर दुर्बिण ठेऊन हेलियमचा शोध लावला त्या जागेला आजही “साहेबांचे ओटे”म्हणूनच ओळखले जाते. लॉकीयर यांच्या या शोधामुळे विजयदुर्ग किल्ल्याला हेलियमचे पाळणाघर असेही म्हटले जाते. या सर्व घटना विचारत घेता, हेलियमचा शोध हा केवळ कोकणाच्याच अभिमानाचा विषय न होता, तो संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि भारतीयांच्या अभिमानाचा विषय व्हायला हवा. त्यादृष्टीने, विजयदुर्ग किल्ल्यावर हा दिवस एखाद्या वैज्ञानिक उपक्रमाने साजरा केला जावा असा निश्चय माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुरत्न समृद्धी योजना समिती आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत, विजयदुर्ग यांच्या वतीने केला गेला. तो गेली अनेक वर्षे यशस्वीपणे राबविला जात आहे. यंदाही १८ ऑगस्ट रोजी “जागतिक हेलियम दिना”च्या निमित्ताने विजयदुर्ग किल्ल्यावर विविध वैज्ञानिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आला.

आजच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे नेते मा.आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरीब बगदादी, नीरजा जठार,मानसी वाळवे, माजी पंचायत समिती उपसभापती रविंद्र तिरलोटकर, विजयदुर्ग सरपंच श्री काची,खगोलशास्त्रज्ञ परोळेकर,ग्रामपंचायत सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, नागरिक इत्यार्दी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!