आडाळी ग्रामस्थांच्या लाँग मार्चला भाजपचा पाठिंबा

आडाळी ग्रामस्थांच्या लाँग मार्चला भाजपचा पाठिंबा

*कोकण Express*

*आडाळी ग्रामस्थांच्या लाँग मार्चला भाजपचा पाठिंबा…*

*स्थानिक नेतृत्वामुळे प्रकल्प रखडला माजी आमदार राजन तेली यांची टीका…..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करू शकणारा सीवर्ड प्रकल्प आम्ही आणला होता, मात्र आता सत्तेत असणारे आणि त्यावेळी शिवसेनेत असणाऱ्यांनीच या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे सीवर्ड प्रकल्प होऊ शकला नाही. आता हेच नेते आडाळी एमआयडीसीला विरोध करत आहेत. आम्ही आडाळी एमआयडीसीसाठी गेली दहा वर्ष प्रयत्न करत आहोत, मात्र सावतवाडीच्या स्थानिक नेतृत्वाने उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिल्यामुळे एमआयडीसी प्रकल्प रखडला त्यातील भूखंडाचे वाटप अद्याप पर्यंत झालेले नाही. त्यामुळे 20 ऑगस्ट रोजी आडळी ग्रामस्थ काढत असलेल्या आडाळी ते बांदा लाँग मार्चला भाजप पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. असे भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी पत्रकार परिषदेत आज जाहीर केले.

आडाळी एमआयडीसीतील प्लॉट कोणाला वितरित करू नका त्या ठिकाणी मोठा उद्योजक येणार आहे असे पत्र आमदार दीपक केसरकर

यांनी उद्योगमंत्र्याकडे दिल्यानेच तेथे कोणीही उद्योजक आले नाहीत. असा आरोप हि आज राजन तेली यांनी यावेळी केला.

या प्रकल्पाबाबत आमचे प्रयत्न येथे तोकडे पडले. त्यामुळे शासनाच्या विरोधात नाही परंतू शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जे सरपंच पुढे आले त्यांच्या 20 मार्चला निघणाऱ्या लाँग मार्चला भाजपा म्हणून आम्ही सहभागी होणार आहोत. आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग येईपर्यंत आमचा पाठिंबा आडाळी ग्रामस्थांना कायम असेल असे तेली यांनी सांगितले. यावेळी त्याच्यासोबत महेश सारंग, रवी मडगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!