वैभव नाईक यांची जनतेला अभिप्रेत कामे नाहीत, फक्त टेंडरराज आणि स्टंटबाजी, किसन मांजरेकर यांचे टीकास्त्र

वैभव नाईक यांची जनतेला अभिप्रेत कामे नाहीत, फक्त टेंडरराज आणि स्टंटबाजी, किसन मांजरेकर यांचे टीकास्त्र

*कोकण Express*

*वैभव नाईक यांची जनतेला अभिप्रेत कामे नाहीत, फक्त टेंडरराज आणि स्टंटबाजी, किसन मांजरेकर यांचे टीकास्त्र*

मालवण बस स्थानकाची जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपवली आहे आ. नाईक यांनी त्यापासून दूरच राहिले तर उत्तम होईल

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण बस स्थानकाची पाहणी करून ते डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन आमदार वैभव नाईक यांनी स्टंटबाजीशिवाय काहीही साध्य केलेले नाही. जी जी कामे अडकली होती ती महाराष्ट्रभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युती सरकार तिप्पट ताकदीने पूर्ण करत आहेत. आमदार वैभव नाईक फिरकले नाहीत तरी कुडाळ मालवणमधील कामे होत राहतील, हे नक्की आहे.

मालवण बस स्थानकाची जबाबदारी आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील भूमीपुत्र असणारे नेते रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपवली आणि आपण त्यापासून दूरच राहिले तर उत्तम होईल. अन्यथा चांगल्या कामाची उत्तम वाट कशी लावायची हे नाईकांनी कुडाळला दाखवून दिले आहे. मालवणच्या नागरिकांनी कुडाळ बसस्थानकाचा त्रास आणि वैभव नाईकांचा विकास जवळुन अनुभवला आहे. पूर्वीचे व आताचे बसस्थानक यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता जे कुडाळचे बस स्थानक हे स्थानक कमी आणि ओसाड भूतबंगला जास्त आहे. त्याच्यात पन्नास माणसेही व्यवस्थित व सुरक्षित राहू शकत नाहीत किंवा बसू शकत नाहीत. किमान दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करून हैबस स्टॅन्ड बांधले, पण पावसात लोकांवर भिजायची वेळ येते. यातच जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे, पण आता त्याची बिले वसूल झाल्याने नाईकांना जनतेशी देणेघेणे उरलेले नाही. कुडाळच्या बसस्थानकाच्या खर्चाची चौकशी लावायची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जाईल. मात्र त्या भ्रष्टाचारी कामाची पुनरावृत्ती मालवणला होऊ नये यासाठी मालवणच्या जनतेनेही सजग रहात आराखडा व खर्च याचा हिशोब घ्यावा, असे रोखठोक आवाहन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सचिव किसन मांजरेकर यानी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!