*कोकण Express*
*महावितरणचे उपअभियंता विलास बगडे यांच्याकडे जिल्हा व्यापारी संघाची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गणेशोत्सवात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना आणि वीज ग्राहकांना महावितरण कडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तसेच गणेशोत्सवापूर्वी ५ दिवस व गणेश चतुर्थीत ११ दिवस वीज पुरवठा खंडित होता नये. यासाठी वीज वितरण कंपनीने योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी जिल्हा व्यापारी संघातर्फे येथील महावितरणचे उपअभियंता विलास बगडे यांच्याकडे केली. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांची गैरसोय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे..
महावितरण विभागीय कार्यालय कणकवली येथे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी संघटनेनेच्या वतीने अधिकाऱ्यांशी विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, नंदन वेंगुर्लेकर, नितीन म्हापणकर अशोक करंबेळकर, संतोष काकडे, राजेश राजाध्यक्ष, दादा कुलकर्णी, सुप्रिया पाटील आदी व्यापाऱ्यांसह सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र सुत्यान, सहाय्यक अभियंता एस. पी.. राणे, प्रवीण पंडित, अमोल थोरबोले, प्रगती परसगडे उपस्थित होते…
यावेळी गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी महावितरणने व्हाट्सअप ग्रुप तयार करावा. तसेच विभागानुसार लाईनमन आणि त्या
विभागातील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर सर्वत्र प्रसिद्ध करावेत. त्यामुळे जनतेला आपल्या वीज समस्या महावितरण जवळ मांडता
येतील, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.
त्याचप्रमाणे गणेशोत्सवापूर्वी वाहिनीवर धोकादायक स्थिती असलेल्या झाडांच्या फांद्याची कटिंग करण्यात यावी. नांदगाव येथील दोन वर्षापासून वीज पुरवठ्याबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी नांदगाव वासियांनी तेथील कार्यालयाला टाळे ठोकले होते, असं असतानाही तेथील समस्या दूर झाल्या नाहीत, ही बाब राजेश राजाध्यक्ष यांनी अधिकाऱ्यांना विचारली. तेव्हा सहाय्यक अभियंता श्री. पंडित ३३ केवी पावर ला बॅकअप नसल्याने त्याच्या विज समस्या निर्माण होत आहेत, असे सांगितले.
व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी या बैठकीत विज अधिकाऱ्यांकडे विविध समस्या मांडल्या. त्यावर तात्काळ समस्या सोडून आगामी गणेशोत्सवात ग्राहकांना त्रास होणार नाही, अशी काळजी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर उपअभियंता विलास बगडे यांनी आम्ही समस्या मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे