*कोकण Express*
*पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा …..*
*वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाची मागणी; तहसीलदार, प्रशासनाला निवेदन…*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अमलबजावणी करा, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगतीने न्यायालयामार्फत चालविणे आणि पाचोऱ्या चे आमदार किशोर पाटील याच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन वेंगुर्ले तालुका पत्रकार समिती च्या वतीने नायब तहसीलदार संदीप पाणबंद यांना सादर करण्यात आले.
यावेळी पत्रकार समिती चे अध्यक्ष मेक्सी काज, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, जिल्हा सदस्य दिपेश परब, तसेच पत्रकार
के. जी. गावडे, प्रदीप सावत, विनायक वारंग, प्रथमेश गुरव, आपा परब, सीमा मराठे, योगेश तांडेल आदी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत आम्हां पत्रकारांच्या भावना कळवा, अशी विनंती यावेळी पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आली आहे.