*कोकण Express*
*लिंगायत समाज बांधवांचे गुरू कणकवलीत…!*
*समाज बांधव व शहरातील व्यापाऱ्यांनी घेतले दर्शन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील लिंगायत समाजातील धर्मगुरू
श्री. गुरु नीलकंठ शिवाचार्य महास्वामी आदीमठाध्यक्ष धारेश्वर महाराज समवेत राजापूर तालुक्यातील श्री.गुरू रवी शंकर शिवाचार्य महाराज रायपाटन यांनी कणकवली शहरातील लिंगायत बांधवांशी संवाद साधला.लिंगायत बांधव व व्यापाऱ्यांनी दर्शनसाठी गर्दी केली होती.उचले कुटुंबियाच्या घरी भेट दिली.यावेळी गुरूंची पाद्यपूजन करत आशीर्वाद घेतले.
शहरातील उचले दुकानाचे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या बाजारपेठेतील दुकानस्थळाची पाहणी केली.तसेच सदर जागेत विधिवत पूजा करत भूमिपूजन केले.यापुढील काळात कल्याणार्थ व सुख,समृद्धीसाठी विधिवत पूजा करत आशीर्वाद दिले.
यावेळी उचले कुटुंबातील मोहन उचले,आबा उचले,दयानंद उचले,गजानन उचले,शेखर उचले, हरिष उचले,अनिकेत उचले यासह प्रकाश घेवारी,श्री.माळगी शहरातील व्यापारी बापू पारकर,प्रसाद अंधारी,राजू पारकर,अमित सापळे,संदीप अंधारी आदी नागरिक लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

