*कोकण Express*
*कणकवली विधानसभा मतदारसंघा च्या सर्वागीण विकासासाठी 2515 योजनेंतर्गत 5 कोटी निधी मंजूर*
*आम. नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणेंच्या शिफारशीमुळे कणकवली विधानसभा मतदारसंघा च्या सर्वागीण विकासासाठी 2515 योजनेंतर्गत 5 कोटी रुपयांचा विकासनिधी राज्य शासनाने जाहीर केला आहे. आ. नितेश राणे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी 14 ऑगस्ट रोजी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मजुरीचे आदेश कार्यसिन अधिकारी अभिजित तेलवेकर यांनी काढले आहेत. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या निधीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळणार आहे. आ. नितेश राणनी भरीव विकासनिधी मंजूर करून आणल्याबद्दल कणकवली विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

