कणकवली येथे भाजपा सोशल मीडियाच्या वॉररूम चे उद्घाटन

कणकवली येथे भाजपा सोशल मीडियाच्या वॉररूम चे उद्घाटन

*कोकण Express*

*कणकवली येथे भाजपा सोशल मीडियाच्या वॉररूम चे उद्घाटन!*

*ऑनलाईनच्या माध्यमातून राज्यभरातील भाजपच्या सोशल मीडिया वॉरीयर्सशी आमदार नितेश राणे यांनी साधला संवाद.!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टीच्या राज्यभरातील विधानसभा निहाय सोशल मीडिया वॉररूम ची उदघाटने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवरांच्या हस्ते होत आहेत.

कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा क्षेत्राच्या भाजपा सोशल मीडियाच्या वॉररूम चे उद्घाटन आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपन्न झाले. तसेच यावेळी ऑनलाईन द्वारे राज्यभरातील भाजपच्या सोशल मीडिया वॉरीयर्सशी आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला.

यावेळी विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, कणकवली विधानसभा वॉररूम प्रमुख विकास पवार, कंटेंट रायटर महेश बागवे, अनिकेत जामसंडेकर, सदस्य प्रज्वल वर्दम, गणेश राणे, अमोल गुरव आदी उपस्थित होते तसेच भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर, आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!