ईशा सावंत हिचा वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक

ईशा सावंत हिचा वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक

*कोकण Express*

*ईशा सावंत हिचा वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात मूळची गडमठ येथील व सध्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय रत्नागिरी च्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणारी ईशा जयराम सावंत हिने द्वितीय क्रमांक मिळविला. लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या यशाबद्दल इशाचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.

ईशा जयराम सावंत ही गडमठ येथील असून गेली अनेक वर्षे तळेरे येथे राहत आहेत. सध्या ती रत्नागिरी येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालयात शिकत आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने रत्नागिरी नगर परिषदेमार्फत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी आजची पत्रकारिता टिळकांच्या नजरेतून हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेची वेळ १० मिनीटे होती. ही स्पर्धा पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे झाली.

या स्पर्धेपूर्वी महाविद्यालयात पात्रता फेरी झाली. त्यामध्ये एकूण 12 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधून 4 स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड झाली. रत्नागिरी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ईशा ने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रत्नागिरी नगरपरिषदेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. तिला उदय सामंत यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी ईशाला वाडमय प्रमुख शिल्पा देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!