नाभिक समाजाच्या उपक्रमामुळे समाजातील कलाकारांना व्यासपीठ

नाभिक समाजाच्या उपक्रमामुळे समाजातील कलाकारांना व्यासपीठ

*कोकण Express*

*नाभिक समाजाच्या उपक्रमामुळे समाजातील कलाकारांना व्यासपीठ*

*कणकवली थे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नाभिक मंडळाच्या वतीने अशा प्रकारचे उपक्रम राबवून समाजामध्ये एक वेगळा संदेश दिला जात आहे. हा उपक्रम स्तुत्य असून नाभिक समाजाने यापुढे देखील कणकवली शहरात कोणताही समाजयोपगी उपक्रम हाती घ्यावा. त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा असे प्रतिपादन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. कणकवली भालचंद्र महाराज संस्थान मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित विठ्ठल भक्त सेना या दशावतारी नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी श्री नलावडे बोलत होते. यावेळी नाभिक समाजाचे विविध पदाधिकारी व नाभिक समाज बांधव उपस्थित होते. नाभिक समाजाने अशा उपक्रमांच्या माध्यमातून लोककला समाजामध्ये रुजवण्यासोबतच समाजातील कलावंतांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार श्री नलावडे यांनी काढले. यावेळी समाज बांधवांकडून नलावडे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!