*कोकण Express*
*मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत फोंडाघाट गावात सरपंच सौ. संजना आग्रे यांच्या हस्ते शिला फलकाचे अनावरण*
*कणकवली : प्रतिनिधी*
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान अंतर्गत फोंडाघाट गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा पार पडला. यानिमित्ताने फोंडाघाट ग्रामपंचायत ध्वजारोहण सरपंच सौ संजना आग्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान अंतर्गत फोंडाघाट ग्रामपंचायत येथे शिला फलक अनावरण करण्यात आले. हातात दिवे घेवून पंच प्रण शपथ, माझी वसुंधरा, राष्ट्रगीत राज्य गीत, विजयी गीत गाण्यात आले.
यावेळी सरपंच सौ संजना आग्रे , उपसरपंच सौ तनवी मोदी, ग्रामसेवक कोलते भाऊ, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सावंत, आदींसह ग्रामस्थ , शिक्षक, कर्मचारी आशा व अंगणवाड़ी सेविका उपस्थित होते.

