अखेर नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीला मंजुरी मिळाली

अखेर नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीला मंजुरी मिळाली

*कोकण Express*

*अखेर नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायतीला मंजुरी मिळाली*

*नवीन कुर्ली ग्रामस्थांकडून आनंद उत्सव साजरा*

गेल्या २७ वर्षाच्या कालखंडानंतर दि. ११/८/२०२३ रोजी ग्रामसचिवालयातून नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुरी ची अधिसूचना जाहीर झाली.
त्या निमित्ताने आज नवीन कुर्ली भवानी मैदान येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांनी उपस्थितीताना मार्गदर्शन केले आणि ग्रामपंचायत मंजूर करण्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगून ग्रामस्थांचे आभार मानले.
या प्रसंगी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ आणि महिला वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!