*कोकण Express*
*कणकवलीत होलसेल कापड विक्री सेल बंद करत आ. नितेश राणे यांनी काय साध्य केले परशुराम उपरकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
बँडेड कपडे घालणाऱ्याना आम जनतेची समस्या कशी कळणार ? कणकवलीतील अरविंद साड़ी सेंटरच्या बिग सेल मध्ये अगदी माफक दरात सेवा मिळत होती. कणकवली बाजारपेठेतील दुकानांपेक्षा स्वस्त दरात कपडे मिळणार होते. महागाईच्या काळात स्वस्त दरात जनतेला कपडे घेता येणार होते. ज्या भाजपा पक्षाच्या माजी लोकप्रतिनिधींनी त्या सेलचे उदघाटन केले, नगरपंचायतने नाहरक दाखला दिला. मात्र, शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी आमदार नितेश राणेकडे सेल बंद करण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांचा फायदा बघून स्थानिक आम जनतेला होणार आर्थिक फायद्याआड येणारे आमदार नितेश राणे हे पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.
श्रावण महिन्याच्या तोंडावर जनतेला महागाई भडकली असताना अगदी अल्प दरात खरेदी चा आनंद घेता येणार होता, त्या आनंदावर आमदार नितेश राणेंनी विरजण घातले आहे. आमदार नितेश राणे यांनी सेल बंद करून काय साध्य केले? असा सवाल माझी आमदार तथा मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला आहे.
काही दिवसापूर्वी सर्वसामान्य जनतेला कमी पैशात चांगल्या वस्तू या सेलमधून मिळत होत्या आणि तो सैल आमदार नितेश राणे आणि बंद पाडला. पण तो सेल बंद करून आमदार नितेश राणे यांनी सर्वसामान्य लोकांची नुकसान केल्याची टीका श्री. उपरकर यांनी केली…

