*कोकण Express*
*अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक…*
*राजापूर / प्रतिनिधी*
अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात नाटे पोलिसांनी धडक कारवाई करताना कशेळी ते पूर्णगड अशी अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले.
जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुळकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड याच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलिसांनी दि. 9 ऑगस्ट-
रोजी सायंकाळी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित चेतन सुरेश यादव (रा. राजापूर, रत्नागिरी) आणि रंजन शंकर खानविलकर (रा.
राजापूर, रत्नागिरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटकही केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सदरची कारवाई नाटेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश केदारी, पोलिस कॉन्स्टेबल सागर कोरे, दिगंबर ठोके, किरण जाधव, सागर गुरव यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमध्ये सुटका करण्यात आलेली पाचही जनावरे नाटे पोलीसांमार्फत एका शेतकरी कुटुंबाच्या ताब्यात तात्पुरत्या स्वरुपात चारा व निवारा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून जाणाऱ्या कशेळी ते पूर्णगड या सागरी महामार्गावर सायंकाळी 4 वा. ते 8 वा. च्या दरम्यान नाटे पोलीस पथकाद्वारे वाहन तपासणी करण्यात येत होती. यावेळी समोरून एक वाहन ज्याचा हौदा हा एका काळ्या प्लॅस्टिक कापडाने झाकलेला व बंद स्थितीत दिसून आला. यावेळी तपासणी करीता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या पथकाला या वाहनाचा संशय आला, त्यांनी लागलीच या वाहनाला थाबवून आणि चाहनावर झाकलेले कापड काढून आतमध्ये खात्री केली असता त्यांना या वाहनामध्ये पाच गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून भरलेली दिसून आली. या पोलिस पथकामार्फत गाडीमध्ये असलेल्या पाचही जनावरांची सुरक्षित सुटका करताना संशयित चेतन सुरेश यादव आणि रंजन शंकर खानविलकर (दोघेही रा. राजापूर, रत्नागिरी) यांना त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात नाटे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.