आ. नितेश राणेंच्या माध्यमातून आम्हा स्थानिक व्यापाऱ्यांना मिळाला न्याय.

आ. नितेश राणेंच्या माध्यमातून आम्हा स्थानिक व्यापाऱ्यांना मिळाला न्याय.

*कोकण Express*

*आ. नितेश राणेंच्या माध्यमातून आम्हा स्थानिक व्यापाऱ्यांना मिळाला न्याय..*

*कणकवली शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी मांडली भूमिका; तो कापड विक्री सेल झाला बंद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवलीत यापूर्वी आलेले सर्व सेल हे किरकोळ व्यापा-यांचे होते. मात्र यावेळी आलेला सेल व्यापारी हा कोल्हापूर गांधीनगर येथील घाऊक व्यापारी होता. त्यामुळे कणकवलीतील स्थानिक बाजारपेठेतील कापड दुकान आणि त्या सेल मधील दरात फरक हा दिसत होता. घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापार करायचा नसतो, हा अलिखित नियम असतो. मात्र सदर व्यापाऱ्याने सेलद्वारे किरकोळ व्यापार सुरू केला. ऐन सणाच्या तोंडावर स्थानिक व्यापाऱ्याचे नुकसान होणार होते. त्यामुळे आम्ही किरकोळ विक्रेत्या व्यापाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आ. नितेश राणेंच्या कानावर आमची खंत व्यक्त केल्यावर तो सेल लगेच बंद झाला आणि आम्हाला न्याय मिळाला असल्याची भूमिका कापड व्यावसायिक संघटनेच्यावतीने मांडण्यात आली.

कणकवली येथील कापड व्यापाऱ्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मंदार आळवे, महेश देसाई, सुरभा

घाडीगांवकर, प्रवीण डामरी, दादा केणी, रमित घाणेकर, रामू बजाजी, सतीश गावडे, सूरज रणशूर महेश नार्वेकर आदी उपस्थित होते…

कायदेशीरदृष्ट्या त्या सेलचा व्यापार हा बेकायदेशीर होता. कायदेशीर प्रक्रियेने सेल बंद करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे आमदार नितेश राणेंकडे गेल्यानंतर आम्हाला लगेच न्याय मिळाला, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. सर्वसामान्य ग्राहक जनतेच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत. ग्राहकांच्या फायद्याआड आम्ही कापड विक्रेते कधीही नव्हतो आणि यापुढेही नसणार हे निश्चित आहे. त्या सेलच्या व्यापान्याने सणाच्या तोंडावर दिशाभूल करणारा व्यवसाय सुरु केला होता. विक्री करत असलेल्या मालाचा दर्जा काय होता? याचाही विचार करणे गरजेचे आहे. कणकवलीतील स्थानिक व्यापाऱ्यांचेही कुटुंब आहे. त्याचेही कर्ज आणि अर्थकारण आहे. याचाही विचार व्हायला हवा, सेल वाला व्यापारी हा घाऊक विक्रेता होता, पण त्याने जिल्ह्यात एकाही किरकोळ विक्रेत्याला कापड विक्री तो करत नव्हता तसे असते तर त्याने जिल्ह्यात असा सेल सुरू केला नसता कारण त्या सेलमुळे त्याच्याकडून कापडवस्तू घेणाऱ्या जिल्ह्यातील त्याचे गिन्हाईक असलेल्या किरकोळ विक्रेत्याला आर्थिक फटका सोसावा लागला असता त्यानंतर या सेल व्यापान्याला त्याचे गिन्हाईक असलेल्या त्या सेल लावलेल्या व्यापान्याला जाब विचारला असता, यापुढे अशा प्रकारे घाऊक व्यापाऱ्याने कणकवलीत सेल लावल्यास त्याबाबत कोणती दक्षता घ्यावी याची आम्ही खबरदारी घेवू असा इशारा मंदार आळवे आणि व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!