*कोकण Express*
*राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी शहरातील समस्यांबाबत मुख्याधिकारी साळुंखे यांचे वेधले लक्ष*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी शहरातील विविध समस्यांबाबत मुख्याधिकारी साळुंखे त्यांचे लक्ष वेधले. माठेवाडा मदारी रोड हा भरवस्तीचा शहरी भाग आहे. या भागातील रस्त्यांवर भरपूर नागरीकांची वर्दळ असते. तसेच तेथे एक प्रसुती रुग्णालय असल्याने तेथून रुग्णांच्या नातेवाईकांची ये जा होत असते. सदर भागातील गटार शेजारील रस्ता खाचलेला असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गटारात अडकलेला कचरा न काढल्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्याचप्रमाणे रस्त्या बाजूची झाडी वाढल्याने वाहन चलविण्यास व नागरीकांची पायी जाण्यास त्रास होत आहे. वारंवार नगरपरिषदेला कल्पना देवूनही त्यावर उपाय योजना होत नसल्याचे दिसते. त्याचप्रमाणे उपरकर शुटिंग रेन्जकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याचे स्लॅब कोसळलेले आहे. पुढील महिन्यात गणेश चतुर्थीचा उत्सव असल्याने या रस्त्यावरुन श्री गणेश मुर्ती रहिवास्यांना ने आण करण्यासाठी सोयिस्कर होण्यासाठी आपण लवकरात लवकर कोसळलेला स्लॅब घालून घ्यावा. असे निवेदन पत्राद्वारे सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना केले. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, बावतीस फर्नांडिस, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, मारिता फर्नांडिस 1, अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष एडवोकेट सौ राबिया शेख आगा, तौसीफ आगा, आदी उपस्थित होते.

