*कोकण Express*
*हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपत्र…*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांचा पाचव्या स्मृतिदिन आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे देशभक्तीपर गीते, भाषण, रक्तदान
शिबीर अशा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.
प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, डॉ. डी. एम. सिरसट, कु. तुषार पार्टी, कुमारी प्रणिता फोंडके यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.
तर हर्ष नकाशे आणि विद्यार्थ्यांनी देश भक्ती गीते सादर केले. 500 विद्यार्थी- विद्यार्थीनीकडून हुतात्मा मेजर कौसतुम राणे यांच्या परिवारास
500 पत्र पाठवण्यात आली.
हु. मे कौस्तुभ राणे कुटुंब मित्र सिंधुदुमित्र प्रतिष्ठान, रोटरी क्लब, वैभववाडी व राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट याच्या वतीने हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 22 रक्त दात्यानि रक्त दान केले, याला ही चांगला प्रतिसाद मिळाला.

