*कोकण Express*
*सावंतवाडी रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामाचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते भूमिपूजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, मंत्री अदिती तटकरे ऑनलाईन तर आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली है
स्थानिक स्थानकामध्ये उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर मळगाव स्थित सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या बाह्य परिसराचे सुशोभीकरण तसेच रस्ते काँक्रिटीकरण व अन्य कामांचे
भूमिपूजन माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, निरवडे सरपंच सुहानी गावडे, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, खरेदी-विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे, माजी जि उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी जि.प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, सौ. शर्वाणी गावकर, माजी सभापती मानसी धुरी, पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक अॅड. परिमल नाईक, आनंद नेवगी, प्रसन्ना कुबल, बांदा सरपंच प्रतीक्षा नाईक, उपसरपंच जावेद खतीब, भाजपचे पदाधिकारी सुधीर दळवी, शेखर गांवकर, संतोष गावडे, मळगावचे माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर, शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ बुगडे, परिक्षित मांजरेकर, तुकाराम बर्डे, केतन आजगावकर, संदीप बांदेकर, अमोल पावसकर, उदय जामदार, उदय सावळ, गुरुनाथ गावकर, मेघना साळगावकर, वंदना मडगावकर, आनंद पांढरे, वेंगुर्ला शिवसेना पदाधिकारी नितीन मांजरेकर, शासकीय ठेकेदार रोहित नाडकर्णी, भाऊ कांबळी, अजित सातार्डेकर, सहदेव सामंत, शाम सांगेलकर, यांसह भाजपचे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

