माध्यमिक विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शिवणकला आणि वीजतंत्री प्रमाणपत्र कोर्स सुरु

माध्यमिक विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शिवणकला आणि वीजतंत्री प्रमाणपत्र कोर्स सुरु

*कोकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शिवणकला आणि वीजतंत्री प्रमाणपत्र कोर्स सुरु*

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई च्या वतीने कौशल्य विकास अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट इंडिया या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने माहे जुलै पासून शिवणकला आणि वीजतंत्री प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्यात आलेले आहेत, या कोर्स साठी ज्युनिअर कॉलेजमधील ३४ विद्यार्थिनींनी शिवणकला साठी प्रवेश घेतला तर वीजतंत्रीसाठी ४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला*.

*सदर प्रशिक्षण हे आठवड्यातील मंगळवार,गुरुवार व शनिवार या दिवशी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत दिले जात असून तीन महिने कालावधीचा परिपूर्ण कोर्स आहे, या प्रशिक्षणासाठी,सन्मा. श्री सतीशजी सावंत (अध्यक्ष, क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संबोधित केले की आजची शिक्षण पद्धती ही पारंपारिक आहे या शिक्षण पद्धतीला व्यावसायिक शिक्षणाची जोड दिल्यास भविष्यातील स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, शालेय समिती चेअरमन मा.श्री. आर.एच. सावंत, शालेय समिती सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री.सुमंत दळवी,पर्यवेक्षक मा.श्री.बयाजी बुराण यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या*.
*या प्रशिक्षणासाठी शिवणकला कोर्स मार्गदर्शक सौ.साक्षी संतोष दळवी तर वीजतंत्री कोर्स साठी श्री.संदीप वासुदेव पेडणेकर तसेच विभाग प्रमुख म्हणून माध्यमिक विभागातील सौ. एस.एम. न्हिवेकर मॅडम (सहा. शिक्षिका) व उच्च माध्यमिक विभागातील श्रीम. एच. बी. पटेल मॅडम (सहा. शिक्षिका) काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!