*कोकण Express*
*आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत हे विजयाची हॅटट्रीक साधणार ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास*
*महागाई, बेरोजगारी, बंद होत असलेले उद्योगधंदे यावर कधीतरी राणे बंधुनी भाष्य करावे असा दिला सल्ला*
*मालवण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण येथील पक्षाच्या तालुका शाखेत आज एक पत्रकार परीषद घेतली. तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की आगामी निवडणुकीत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची हॅटट्रीक होणार असा विश्वास आहे. याच दरम्यान त्यांनी विरोधकांच्या विविध टीकांचा समाचार घेतला. भाजपा व राणे कुटुंबियांनी मागील पराभवातून बोध घ्यायचाही त्यांनी सल्ला दिला.

