*कोकण Express*
*कणकवली तहसीलदार देशपांडे यांनी आमदार नितेश राणे यांची घेतली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तहसीलदार पदी नव्याने नियुक्त झालेले दिक्षांत देशपांडे यांनी आमदार नितेश राणे यांची ओम गणेश निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कणकवली तालुक्यात चांगले काम करून राज्यात नावलौकिक कमवा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. यावेळी बदली झालेले आणि देवगड तहसीलदार म्हणून नियुक्त झालेले आर. जे. पवार उपस्थित होते.

