*कोकण Express*
*ठाकरे गटाने वचपा काढला; एकाच्या बदल्यात तीन “राणे समर्थक” माजी नगरसेवक फोडले!*
*लीलाधर पराडकर, बाबू कांदळकर, सौ. संतोषी कांदळकर या तीन माजी नगरसेवकांसह भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष अंजली पराडकर यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश*
*दांडी हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज; छोट्या मोठ्या धक्क्यांनी या बुरुजाची कपची सुद्धा निघणार नाही: सेना पदाधिकाऱ्यांचे प्रत्त्युत्तर*
*मालवण ः प्रतिनिधी*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दांडी येथील माजी नगरसेवक पंकज सादये यांना फोडत ठाकरे गटाला हादरा देणाऱ्या भाजपाला ठाकरे गटाने दोनच दिवसात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे एका माजी नगरसेवकाच्या बदल्यात ” राणे समर्थक” तीन माजी नगरसेवकांना फोडत ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला आहे. या माजी नगरसेवकांमध्ये लीलाधर पराडकर, संतोष उर्फ बाबू कांदळकर, सौ. संतोषी कांदळकर यांचा समावेश असून भाजपच्या वॉर्ड अध्यक्ष अंजली लीलाधर पराडकर यांनीही कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. दांडी भाग हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा आहे. इथे दगडालाही शेंदूर फासला जातो. पण शेंदूर फासला म्हणून त्यात देवपण येतेच असे नाही. एखादा माजी नगरसेवक गेला म्हणून शिवसेनेला फरक पडणार नाही. दांडी हा शिवसेनेचा अभेद्य बुरुज असून अशा छोट्या मोठ्या धक्क्यांनी या बुरुजाची कपची सुद्धा हलणार नाही, असे प्रत्युत्तर ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आले आहे. या पक्ष प्रवेशानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसैनिकांनी जल्लोष केला.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पंकज सादये यांनी गुरुवारी भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. याची सव्याज परतफेड शिवसेनेकडून शनिवारी करण्यात आली. राणे समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या तीन माजी नगरसेवकांना आज ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, मंदार ओरस्कर, महेश जावकर गणेश कुडाळकर, सेजल परब, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, पूनम चव्हाण, स्वप्नील आचरेकर निना मुंबरकर, अन्वय प्रभु यशवंत गावकर, मंदार गावडे, श्वेता सावंत, नंदा सारंग, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, राजा शंकरदास, सन्मेष परब, बड्या सरमळकर सिद्धेश मांजरेकर, समीर लब्दे, सदा लुडबे, किरण वाळके, दीपा शिंदे, गौरव वर्लेकर, तृप्ती मयेकर, निनाक्षी शिंदे, सुर्वी लोणे, अंजना सामंत, माधुरी प्रभु दादा पाटकर, सचिन गिरकर, पॉली गिरकर, सोमा लांबोर रोशन कांबळी, करण खडपे, चंदू खोबरेकर, बाबू वाघ, भाई चोपडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

