*कोकण Express
*कणकवली उपविभागातील कोतवाल आरक्षण सोडत..*
*कोतवाल आरक्षण कणकवली ६, तर देवगड ४ व वैभववाडी ४ पदांसाठी सोडत ; कणकवली प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली उपविभागातील कणकवली, वैभववाडी, देवगड या तीन तालुक्यातील कोतवालांच्या मंजूर पदांपैकी ८० टक्के पदभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ पैकी १४ पदांसाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. कणकवली तालुक्यातील ६, तर देवगड ४ व वैभववाडी ४ पदांसाठी सोडत काढण्यात आली. त्यामुळे भविष्यात या गावांना हक्काचा कोतवाल मिळणार आहे. तहसील कार्यालयात कु. शिवाली सुरेश चव्हाण हिच्या हस्ते चिट्ट्यांद्वारे ही सोडत काढण्यात आली.
कणकवली तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी परिवेक्षाधीन प्रांताधिकारी करिश्मा नायर (आयएएस), तहसीलदार आर. जे. पवार (देवगड), तहसीलदार दीक्षांत देशपांडे (कणवकली), दीप्ती देसाई (वैभववाडी), निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे व अन्य उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील कलमठ, घोणसरी, नादगाव, लोरे, दिगवळे व दरवडे या सहा गावांसाठीच्या कोतवाल पदाच्या काढण्यात आलेल्या सोडतीत कलमठ भटक्या जमाती के प्रवर्गासाठी वरवडे भटक्या जमाती ड प्रवर्ग महिलेसाठी, घोणसरी अनुसूचित जमातीसाठी, लोरे व नांदगाव ओबीसी प्रवर्गासाठी, तर दिगवळे जोबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.
देवगड तालुक्यातील वळिवडे, कुवळे, उडील, गवाणे या चारपैकी गवाणे हे अनुसूचित जमाती वळीवडे हे कोतवालपद ईडब्ल्यूएससाठी, उंडील सर्वसाधारण प्रवर्ग महिला, तर कुवळे हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाले.
वैभववाडी तालुक्यातील कुसूर
तिरवडे तर्फ सौंदळ, आचिर्णे व भुईबावडा यापैकी विमुक्त जाती अ साठी तिखडे तर्फ सौंदळ, कुसूर भटक्या जमाती प्रवर्गासाठी, भुईबावडा इतर
मागास प्रवर्गासाठी, तर आचिर्णे हे ईडब्ल्यूएस महिला प्रवर्गासाठी राखीव झाले.

