*कोकण Express*
*ती जीर्ण आणि धोकादायक कमाण अखेर काढली,ग्रामस्थांत समाधान*
*कासार्डे : संजय भोसले*
तळेरे कोल्हापूर मार्गावरील धोकादायक दिशा दर्शक लोखंडी कमान अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटविण्यात आली. याबाबत तळेरे येथील राजू जठार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली होती.
गेले अनेक महिने तळेरे -कोल्हापूर रस्त्यावर धोकादायक दिशादर्शक लोखंडी कमान होती. कित्येक वर्षांपूर्वीची ही लोखंडी कमान असल्याने ती जीर्ण झाली होती. सदरची कमान ताबडतोब हटविण्याची मागणी होत होती. कमानी परिसरात नेहमीची वरदळ असल्याने त्यापासून धोका होता.
ही बाब सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या निदर्शनास राजू जठार यांनी निदर्शनास आणली. त्यांनी या प्रकरणी त्वरित दाखल घेऊन, सर्व परवानगी घेऊन सदरची धोकादायक कमानी तोडण्याचे आदेश दिले व त्याची त्वरित अंमलबजावणी सुद्धा केली. यामुळे भविष्यात होणारा मोठा अपघात टळला, याबद्दल प्रवासी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

