*कोकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये दिनांक १० व ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय देश भक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे गुरुवार दिनांक १० आणि शुक्रवार दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी गुरुवर्य पुरस्कृत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे*.
या स्पर्धेसाठी समूहगीताचे बंधन नाही. प्रत्येक गटातून एक विद्यार्थी संघ प्रशालेतून पाठवावयाचा आहे. ८ऑगस्ट २०२३ पर्यंत आपली नावे सौ. एस.एम. न्हिवेकर मॅडम (सहा शिक्षिका) मो. ९४२२४६४७४७ या नंबर वर पाठवावीत. स्पर्धेसाठी प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कमेची पारितोषिक दिली जाणार आहेत.ही स्पर्धा तीन गटात असून गुरुवार दिनांक १० ऑगस्ट रोजी स.१० वा. प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात स्पर्धा सुरू होईल. शुक्रवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी स १० वा. माध्यमिक गटाची स्पर्धा सुरू होईल. पहिला गट (पहिली ते चौथी) यासाठी प्रथम पारितोषिक रू.१५००/- , द्वितीय रू. १०००/-, तृतीय रू. ७००/- व उत्तेजनार्थ रू. ५००/- असणार आहे. पाचवी ते सातवी हा दुसरा गट असून प्रथम पारितोषिक रू. २०००/-, द्वितीय रू. १५००/-, तृतीय रू. १०००/- व उत्तेजनार्थ रू. ७००/- असणार आहे. तिसरा गट आठवी ते दहावी यासाठी प्रथम पारितोषिक रू. २५००/-, द्वितीय रू. २०००/-, तृतीय रू. १५००/- व उत्तेजनार्थ रू. १०००/- अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येक क्रमांक प्राप्त संघांना सन्मानचिन्ह सुद्धा दिले जाणार आहे.
यात प्रत्येक समूहामध्ये किमान तीन व कमाल आठ विद्यार्थी असावेत. समूहगीताचा कालावधी कमीत कमी तीन मिनिट व जास्तीत जास्त सहा मिनिटे असावा. इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा समावेश करता येऊ शकेल. संघाने ठरवून दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक संघाने स्वतःची वाद्ये व वाद्यवृंद यासह उपस्थित राहावे. तरी या स्पर्धेसाठी शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. सुमंत दळवी (मुख्याध्यापक/प्राचार्य). मो. ९४२०२०६५०८ व श्री.बयाजी बुराण(पर्यवेक्षक) मो ९४२११४४६०५ यांच्याशी संपर्क साधावा.

