*कोकण Express*
*जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान सिंधुदुर्गच्या युवा समितीच्यावतीने कणकवली येथे स्वच्छता अभियान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान सिंधुदुर्ग, युवा समितीच्यावतीने कणकवली येथे रेल्वे स्थानक परिसरात दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता JNMS सिंधुदुर्ग युवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
सदैव कोकण वासियांना सेवा देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत व स्व स्वरूप संप्रदायाला जोडलेल्या नवीन युवांसोबत अनोख्या पद्धतीने मैत्री दिवस साजरा करून रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छ्ता अभियान राबविण्याचा मानस केला असून या अभियानात सर्वानी सहभागी व्हावे असे, आवाहन करण्यात आले आहे.

