नांदगाव परिसराच्या विकासाला मार्केट यार्ड मुळे मिळणार चालना ; आ. नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश

नांदगाव परिसराच्या विकासाला मार्केट यार्ड मुळे मिळणार चालना ; आ. नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश

*कोकण Express*

*नांदगाव परिसरात होणार मार्केट यार्ड*

*नांदगाव परिसराच्या विकासाला मार्केट यार्ड मुळे मिळणार चालना ; आ. नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश*

आमदार नितेश राणेंच्या मागणीनुसार तात्काळ प्रस्ताव देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे उपसचिवाना निर्देश

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्ड ची निर्मिती करण्याच्या आमदार नितेश राणेंच्या मागणीला पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी हिरवा कंदील दाखवला असून पणन विभागाच्या उपसचिवाना मार्केट यार्ड निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पणन मंत्री सत्तार यांनी दिले आहेत. नांदगाव मध्ये मार्केट यार्ड निर्मितीबाबत आमदार नितेश राणे यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेत निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा काजू नारळ सुपारी भात मासळी, खैर लाकूड, इमारतीसाठी लागणारे लाकूड आदींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. हा उत्पादित माल थेट मुंबई बाजारपेठेत जात आणि नंतर राज्यात तसेच परदेशात पाठवला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते… नांदगाव हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात मार्केट यार्ड ची निर्मिती झाल्यास तिथे लिलावगृह, शेतकरी निवास, बाजार, शीतगृह, भुईकोट गोदामे, हमाल गृह, बैलबाजार याची सुविधा स्थानिक व्यापाऱ्यांना होऊन जिल्ह्याचा व्यापार उदीम वाढेल. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळून त्यांचा आर्थिक फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल. यासाठी नांदगाव रेल्वे स्टेशन नजीक मार्केट यार्ड ची निर्मिती करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!