*कोकण Express*
*मालवणातील निषेध मुकमोर्चास ठाकरे गट शिवसेनेचा पाठींबा….*
*हरी खोबरेकर ; युवासेना, युवतीसेना, सर्व शिवसैनिक सहभागी होणार…..*
*मालवण ः प्रतिनिधी*
मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणातील शांतताप्रेमी नागरिकांच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी
काढण्यात येणान्या निषेध मुकमोर्चास मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठींबा असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी
खोबरेकर यांनी दिली. मणिपूर येथील महिलांवरील अत्याचार कोणत्याही संवेदनशील मनाला यातना देणारे आहेत. या आणि देशात अन्यत्र घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना या निषेधार्थ आहेत. सर्वसामान्य माणसाच्या मालवण वासीयांच्या या मोर्चास आमचा सक्रिय पाठींबा असून या मोर्चात शिवसेना युवासेना, महिला, युवतीसेना व सर्व शिवसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती श्री. खोबरेकर यांनी दिली.