*कोकण Express*
*आमदार वैभव नाईक निष्क्रिय आणि ढोंगी…..*
*निलेश राणेंची टिका, उपवडे कॉजवेत वृक्षारोपण करून भाजपकडून निषेध….*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
आपला मतदारसंघ उघड्यावर टाकून दुसऱ्याच्या मतदारसंघात डोकावणारे आमदार वैभव नाईक हे ढोंगी आहेत. त्याच्या सारखा निष्क्रिय आमदार मी पाहिला नाही, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केली. उपवडे गावातील कॉजवेला पडलेल्या भगदाडामध्ये वृक्षारोपण करत त्यानी नाईक यांच्या भूमिकेत विषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, उपवडे उपसरपंच गवस, माजी सरपंच मनोहर दळवी, कांता कदम, आबा मोरोजकर, कृष्णा गवस, मोहन धुरी, एकनाथ मोजकर, विष्णु निचम, विशाल परब, संजू परब, मोहन सावंत, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, रुपेश कानडे, पप्प्या तवटे, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे आदी उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, या ठिकाणची ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आमदार, खासदार त्यांचेच असताना या गावांमध्ये रस्ते, जोड रस्ते, साकव यांची वाताहत झाली आहे. इतरांच्या मतदार संघामध्ये जाऊन आमदार वैभव नाईक आंदोलने करीत आहेत. पण त्यांचाच अख्खा मतदार संघ खड्ड्यात गेला आहे. हे त्यांना दिसत नाही फक्त स्टंटबाजी करायची हे त्यांचे काम उरले आहे. त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याना पडलेली खड्ड्याची चाळण कोंजव्यांना पडलेले भगदाडे हा त्यांचा आरसा दाखवण्यासाठी उपवडे येथे कॉजवेवर वृक्षारोपण करण्यात आले ढोंगीपणा बंद करून मतदार संघातील कामांकडे लक्ष द्या तसेच झोपी गेला आहात तुम्हाला जाग आणण्यासाठी वृक्षारोपण केले आहे.