*कोकण Express*
*रत्नागिरी तहसील कार्यालयात सामान्य नागरिकांसाठी हेल्प डेस्क नंबर*
रत्नागिरी शहरातील तहसील कार्यालयाने तालुक्यातील नागरिकांसाठी एक हेल्प डेस्क नंबर सुरू केला आहे. महसूल संदर्भात लोकांच्या काही तक्रारी असतील तर व्हॉटसअपद्वारे किंवा फोन कॉलद्वारे तहसील कार्यालयाशी संपर्क साधावयाचा असल्याचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाने १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह सुरू झालेला आहे. त्या औचित्याने व्हॉटसऍप हेल्प डेस्क नंबर ९१३०५२९२३३ असा आहे. रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी व प्रश्न सोडविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी हा हेल्प डेस्क नंबर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या हेल्प डेस्क नंबरचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी तहससिलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.