*कोकण Express*
*कसाल सरपंच राजन परब यांचा भाजपात प्रवेश…..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कसाल सरपंच राजन परब यानी आज आपल्या ग्रामपंचायत सदस्यांसह माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. परब हे आमच्या कुटुंबातीलच आहेत. त्यांची कामे आपण पूर्ण करू, पक्षात त्यांचे स्वागत आहे, असे यावेळी राणे यांनी सांगितले.
परब हे कसाल ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष सरपंच उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यानी तेथे विजय संपादित केला होता. गावचा सरपंच असलो तरी विकास हा महत्वाचा आहे. हा दूरदृष्टीकोन ठेवून त्यांनी भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले, यावेळी भाजप नेते विशाल परब, संजू परब, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, प्रकाश मोर्ये, विकास कुडाळकर, आनंद शिरवलकर, विनायक राणे बंड्या मांडकुलकर मोहन सावंत, रुपेश कानडे, विलास कुडाळकर, राकेश कांदे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.