*कोकण Express*
*फोंडाघाट-बाजारपेठ येथे कणकवली पोलीसांचा छापा*
*४ हजार ५० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त*
याप्रकरणी रितेश राजेंद्र पावसकर (३४, रा. फोंडाघाट, बाजारपेठ), दत्तात्रय मंगेश चिके (१९, रा. फोंडाघाट, बाजारपेठ) आणि आनंद बबन चिके (३७, रा. फोंडाघाट, बाजारपेठ) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १ ऑगस्ट रोजी ७.४५ वा. च्या सुमारास फोंडाघाट बाजारपेठ ते घोणसरी रोडच्या तिट्यावर फोंडा ते कोल्हापूर जाणारे रस्त्याच्या दक्षिण बाजूस केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, सरदार पाटील आणि कॉन्स्टेबल किरण मेथे यांनी केली.