मालवणचे माजी नगरसेवक पंकज सादये भाजपात

मालवणचे माजी नगरसेवक पंकज सादये भाजपात

*कोकण Express*

*मालवणचे माजी नगरसेवक पंकज सादये भाजपात …..*

*निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश; ठाकरे शिवसेनेला धक्का….*

*मालवण ः प्रतिनिधी*

शहरातील पालिकेच्या दांडी प्रभागातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पंकज सादये यांनी अनेक सहकाऱ्यासह आज

सायंकाळी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.

दरम्यान सादये यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गट शिवसेनेला धक्का बसला आहे.

शहर भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, जगदीश गावकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, आबा हडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, देवली माजी सरपंच विजय चव्हाण, चिंदर सरपंच दीपक सुर्वे, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, ममता वराडकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, दिव्या कोचरेकर, भाऊ मोरजे, प्रमोद करलकर, पंकज पेडणेकर, भाऊ मोरजे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालेकर, निकित वराडकर, निनाद बादेकर, राज कांदळकर, अवि सामत, भाई मांजरेकर, नारायण लुडबे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, पंकज सादये यांचे भाजप पक्षात स्वागत आहे. आपण विकासाची जी संकल्पना सांगाल ती भाजपच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. आपल्या पाठीशी आम्ही पूर्ण राहू. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजप मित्रपक्ष केंद्र व राज्य सरकार माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणला जात आहे तसाच यापुढे आणला जाईल. दांडी येथे ही विकास कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल. रस्ता कम बंधारा लवकरात पूर्ण केला जाईल. मागील ९ वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू. जनता सांगेल त्यानुसार विकासाला प्राधान्य राहील. अन्य मोठ्या शहरांच्या धर्तीवर शहराचा विकास हेच लक्ष राहील. विकासासाठी भाजप पक्ष तुमच्या सर्वांच्या सोबत आहे.

आगामी पालिका व सर्व निवडणुकीत भाजपचा १०० टक्के विजय हेच लक्ष तुमचे आमचे सर्वांचे राहणार आहे. जो येईल त्याला भाजपात सन्मानाने स्थान दिले जाईल, असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शहर प्रभारी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर यांनी विचार मांडले.

माजी नगरसेवक पंकज सादये यांच्यासह लुईस फर्नाडिस, सुशांत शेलटकर, राजेश परब, संतोष वायंगणकर, परेश वाघ, नरेश कोयंडे, मंगेश कोयडे, ऍशन फर्नांडिस, जॉन फर्नांडिस, बबलू मोंडकर, विष्णू मालंडकर, राजन परब, दुमिंग फर्नांडिस, राजेश हुले, अंतोन काळसेकर, ज्ञानदेव केळूसकर, बैनी काळसेकर, इशेद डिसोझा, बाबू खोबरेकर, विशाल नागवेकर, रॉनी फर्नांडिस, रोमन, कुशल नागवेकर, सुनील मालंडकर, कुणाल मालंडकर, दिनेश परब, मिलिंद मेस्त, मॉरीस फर्नांडिस, हरेश परब, उमेश हडीकर, दर्शन गावकर, सिद्धार्थ परब, आलू डिसोझा, समीर गावकर, विशाल आचरेकर, किरण कोयडे, सचिन तारी, मोहन परब, कौस्तुभ प्रभू, निलेश मोडकर यासह अन्य सहकान्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!