*कोकण Express*
*कणकवली शहर विकासासाठी ३ कोटी १२ लाख रुपयाचा निधी*
*माजी नगराध्यक्ष समीरनलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती…..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आ. नितेश राणे यांच्याकडे कणकवली शहर विकासासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यानी निधीची मागणी केली होती. त्या मागणीनुसार जा. राणे यांनी कणकवली शहर विकासासाठी ३ कोटी १२ लाख रुपयाचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेवून दिला असून त्याची प्रशासकीय मान्यता कणकवली नगरपंचायतला प्राप्त झाली आहे. ५ मे रोजी कणकवली नगरपंचायतवर प्रशासकीय कार्यकाल सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही कणकवली शहर विकासाबाबत कणकवलीकरांना दिलेला शब्द जपत असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले.
येथील भाजपा कार्यालयात ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक अभी मुसळे, किशोर राणे, चारुदत्त साटम, अजय गांगण आदी उपस्थित होते. यावेळी बंडू हळदी म्हणाले, आमदार मम्मीच्या राणी यांनी २०१८ मधील नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी कणकवलीकरांना जो शब्द दिला त्यावर विश्वास ठेवून कणकवलीकरांनी आ. राणे यांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे सत्ता दिली. त्यानंतर आम्ही गेल्या पाच वर्षात शहरात अनेक विकास कामे केली. यामध्ये रस्ते, वीजपुरवठा, भूसंपादन आदींचा समावेश आहे. मात्र पाच वर्षाची सत्ता संपल्यानंतरही कणकवली शहराच्या विकासासाठी आणखी काही विकास कामांच्या पूर्ततेसाठी निधीची आवश्यकता असल्याची बाब आ. राणे यांचा जवळ व्यक्त केली असता त्यांनी ८ दिवसातच त्यांनी निधीची पूर्तता केली. यामध्ये जुना नरडवे रस्ता ते पिळणकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे यासाठी १ कोटी, टॅबवाडी हिंद छात्रालय ते चौडेश्वरी मंदिर पर्यंत फुटपाथ बांधकामासाठी ८० लाख, चौंडेश्वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर पर्यंत फुटपाथ बांधकामासाठी १ कोटी, तेली आळी रस्ता ते मनोहर स्वरूप कॉम्प्लेक्स पर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे यासाठी १२ लाख तर आरक्षण क्रमांक २७-२८ स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये संरक्षण पॅनलिंग बाधणे व गार्बेज डेपो येथे कचरा विलगीकरण शेडकरिता विद्युत व्यवस्था करण्यासाठी १६ लाख रुपये असा मिळून ३ लाख १२ हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता २० जुलै रोजी कणकवली न. पं. ला प्राप्त झाली आहे. या सर्व कामांची सुरुवात गणेश चतुर्थी नंतर सुरू केली जाणार असल्याचेही श्री. हर्णे यांनी सांगितले. तसेच शहराच्या अन्य काही विकास कामासाठी निधीची आवश्यकता असल्याचेही आ. राणे यांना सांगितले असतात त्यांनी टप्प्याटप्प्याने तो निधी कणकवली नगरपंचायत पर्यंत पोहोचवला जाईल असा विश्वास दिला. मात्र सत्ता संपली किंवा पदे गेली तरीही आम्ही कणकवली शहराच्या विकासासाठी तत्पर राहू, जामदार नितेश राणे यांनी कणकवली नगरपंचायत ला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आभार मानले.