*कोकण Express*
*शिष्यवृत्ती परिक्षेत यशस्वी ठरलेल्यांचा सुनील तळेकर ट्रस्ट आणि वाचनालया मार्फत गुणगौरव*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण विभागातून जिल्ह्यात प्रथम आलेल्या वैदेही राणे आणि आय सी ई एस ई बोर्डात जिल्ह्यात प्रथम आलेल्या देवश्री कणसे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी वरिष्ठ निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, बापू महाडिक, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, सचिव मिनेश तळेकर, डॉ. अभिजित कणसे, राजेश जाधव, नितीन तळेकर, मधुसूदन राणे आदी उपस्थित होते. यावेळी वाचनालय व ट्रस्ट चे सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते
दरवर्षी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. यावेळी कासार्डे माध्यमिक विद्यालयाची वैदेही राणे हिने 210 गुण मिळवत राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तर हुंबरठ येथील बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलची देवश्री कणसे हिने 80 टक्के गुण मिळवत आय सी ई एस ई (इंग्रजी माध्यम) बोर्डात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. वैदेही राणे ही सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाची नियमित वाचक आहे. आणि वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य डॉ. अभिजित कणसे यांची सुकन्या देवश्री असून या दोघांनाही प्रमाणपत्र, शालेय साहित्य देण्यात आले. तर श्रावणी कंप्युटर एज्युकेशन तळेरे यांचेकडून शालेय साहित्य आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला दिलीप तळेकर, शशांक तळेकर, मनोज तळेकर, सतीश मदभावे, श्रावणी मदभावे, राजू पिसे, अशोक तळेकर, दीपक नांदलस्कर, ग्रंथपाल साक्षी तळेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन निकेत पावसकर यांनी तर मिनेष तळेकर यांनी आभार मानले.