जिल्ह्यातील १२ ज्यूदो पट्टूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जिल्ह्यातील १२ ज्यूदो पट्टूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

*कोकण Express*

*जिल्ह्यातील १२ ज्यूदो पट्टूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*कासार्डेतील ज्युनिअर व सिनियर गट जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेचा निकाल जाहीर*

*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत विविध वयोगट व वजनगटातून जिल्ह्यातील १२ ज्यूदोपट्टूंची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे दि.५ व ६ ऑगस्ट रोजी होणा-या राज्यस्तरीय ज्युनिअर व सिनियर गटातील मुलामुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड चाचणी स्पर्धा कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ‘कुडतरकर नाट्यगृहात नुकतीच संपन्न झाली.
यास्पर्धेला जिल्ह्यातील विविध ज्यूदो क्लबच्या खेळाडूंनी सहभाग दर्शविला होता.
*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-*
*ज्युनिअर गट -मुले*
५५कि.ग्रॅ.खालील वजनगटात
तेजसराव महेंद्र दळवी-
प्रथम(सांगेली),
प्रथमेश मारुती राठोड-
द्वितीय-( सावंतवाडी )
वैभव प्रविण गवस (मेढे ता.दोडामार्ग) -तृतीय
६०कि.ग्रॅ.खालील वजनगटात-यशदिप जयंत जाधव(फोंडाघाट )- प्रथम,श्लोक संतोष मर्ये(हुंबरट)- व्दितीय
*ज्युनिअर गट -मुली*
४४ कि.ग्रॅ.खालील वजनगटात- पल्लवी बाळकृष्ण शिंदे(करुळ),
६३ कि.ग्रॅ.खालील वजनगटात- तन्वी प्रकाश पवार(फोंडाघाट),
७० कि.ग्रॅ.खालील वजनगटात- कु.शिवानी शरद म्हात्रे(कोलगाव),
*सिनियर गट मुली-*
४८ कि.ग्रॅ.खालील वजनगटात- कु.कोमल चंद्रकांत जोईल(कोंड्ये -करुळ),
५२ कि.ग्रॅ.खालील वजनगटात-कु प्रतिक्षा गजानन गावंडे , (सावंतवाडी)
५७कि.ग्रॅ.खालील वजनगटात- कु.दिव्यश्री दत्तात्रय मारकड(कासार्डे),
६३ कि.ग्रॅ.खालील वजनगटात- कु.प्राची महादेव खांडेकर(कासार्डे),
*सिनियर गट मुले-*
६० कि.ग्रॅ.खालील वजनगटात-भुषण प्रवीण तोरसकर(फोंडाघाट),
७३ कि.ग्रॅ.खालील वजनगटात-गजानन राजेश माने(कासार्डे),१००कि.ग्रॅ.
खालील वजनगटात- दिनेश बापू जाधव(सावंतवाडी)
या यशस्वी खेळाडू मधून १२ प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
ही निवडचाचणी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यूदो असोसिएशनचे पदाधिकारी तथा प्रशिक्षक अभिजित शेट्ये यांनी पंच म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली.
याप्रसंगी जेष्ठ ज्यूदो खेळाडू सोनु जाधव,कल्पेश तळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ मुंबई चे उपाध्यक्ष तथा जेष्ठ ज्युद़ो खेळाडू अॅड.मिलींद नकाशे, कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.डी.खाड्ये, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस, कासार्डे गावचे उपसरपंच गणेश पाताडे आदींनी अभिनंदन करुन नाशिक येथे होणा-या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!