*कोकण Express*
*▪️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी क्रशर कॉरी वाल्यांचे जावई लागतात का; गुरुदास गवंडे यांचा खोचक सवाल*
*▪️इन्सुली येथील क्रशरवर कारवाई करा; गुरुदास गवंडे यांची मागणी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यात इन्सुली येथे असणाऱ्या क्रशरची डस्ट संपूर्ण तिलारी पाटबंधारे कालव्यामध्ये गेली असून त्याठिकाणी पूर्णतः कालव्याची नास घूस झाली आहे. गेले अनेक वर्ष इन्सुली मध्ये सदर क्रशर कार्यान्वित असून असून याठिकाणी दांडगाई करून येथील तिलारी पाटबंधाऱ्याच्या ब्रिज वरून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. याकडे आरटीओ विभागाचा देखील पूर्णता दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. मात्र, जलसंधारण विभाग अधिकारी यांनी वारंवार तक्रार देऊनही महसूल विभाग कोणतीही कारवाई सदर क्रशर-काॅरीवर का करत नाही. असा सवाल जनमानसातून विचारला जात असल्याची माहिती मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिली.
ओटवणे गावामधून येणारे तिलारी पाटबंधाऱ्याचे पाणी इन्सुली मार्गे निगुडे गावात येणार असून अशाप्रकारे जर खनिकर्म विभाग कालव्यांची नासधूस करण्यासाठी परवानगी देत असेल तर त्या कालव्याचा फायदा तरी काय? अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून होत होत असल्याचे श्री. गुरुदास गवंडे म्हणाले.

दरम्यान येथे असलेल्या खाणींमुळे कालवा पूर्णपणे कोसळण्याच्या स्थितीत आहे. असे असतानाही सावंतवाडी नगरपरिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दंड जागा कचऱ्यासाठी उपलब्ध असतानाही आकारू शकते मग हे क्रशर कॉरीवाले प्रदूषण महामंडळाचे जावई लागतात का असा खोचक सवाल श्री. गुरुदास गवंडे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
महामंडळ जर अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आम्ही अनेक वेळा प्रदूषण महामंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी देखील या विरोधात आवाज उठवला आहे. असे श्री. गवंडे यांनी सांगितले.

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे व जलसंधारण विभागाचे श्री. मुगदल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सखोल चौकशी करू असल्याचे आश्वासन दिल्याचे श्री. गवंडे यांनी म्हटले.
बघायला गेले तर तिलारी पाटबंधाऱ्यामध्ये झालेली कामे ही संपूर्ण निकृष्ट दर्जाची असून आज अनेक ठिकाणी कालवे कोसळत आहेत. तसेच अधिकारी कालव्याचे, महसूल प्रशासन आणि क्रशर मालक यांची मिलीभगत असून शासनाचा कोट्यावधीचा निधी असाच निकृष्ट कामांमध्ये हे अधिकारी खर्च करतात. असे सांगताना श्री. गवंडे संतापले.

या संपूर्ण घटनेची तात्काळ दखल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली नाही तर महाराष्ट्र राज्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. तसेच त्याची एक प्रत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात येणार असल्याचा सज्जड इशारा श्री. गवंडे यांनी दिला.

