मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर !

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर !

*कोकण Express*

*मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर !*

*माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर निशाणा*

*शहरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहिम राबविणेबाबत मुख्याधिकारी सुशेगात असल्याचा आरोप*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या वरून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांवर टिकास्त्र सोडलं आहे. शहरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहिम राबविणेबाबत मुख्याधिकारी सुशेगात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता त्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम आमच्या कालावधीत एका प्रणिमित्र संस्थेच्या माध्यमातून २०१७ ला घेण्यात आली होती. परंतु काही कालावधिनंतर ही मोहीम थांबली. त्यानंतर दोन तीन वेळा याबाबत निविदा प्रक्रिया करण्यात आली, परंतु त्याच दरम्यान असलेला कोविड कालावधी मुळे निविदा प्राप्त होऊ शकल्या नव्हत्या. २०२१ मध्ये यानिविदेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आणी ही मोहिम हाती घेऊन मालवण शहरातील सुमारे ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. त्यामुळेच काही प्रमाणात भटक्या कुत्र्याच्या त्रासावर उपाय योजना करता आली. परंतु पुढील वर्षे सातत्याने ही मोहीम सुरू ठेवणं आवश्यक होत, तर नक्कीच एक दिवस यावर कायमस्वरूपी उपाय योजना होऊ शकणारी होती. परंतु डिसेंबर २०२१ मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आमचा कालावधी संपल्या नंतर या मोहिमेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आला. अजून न. प. निवडणूका झालेल्या नसल्याने गेले १८ महिने नप वर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. परंतु या कालावधीत स्वतःहून तर नाहीच पण आठ महिन्यापूर्वी लेखी कळवूनही या बाबत कुठलीही दखल मुख्य अधिकारी तथा प्रशासक ज्यांनी घेतलेली नाही. या मोहिमेत सातत्य ठेवल्या शिवाय याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार नाही. सध्या मोकाट कुत्रांच्या त्रासाबाबत अनेक तक्रारी माजी लोकप्रतिनिधी कडे येत आहेत, पालिकेकडे येत आहेत. परंतु स्वतःच्या बदलीच्या प्रक्रियेत व्यस्त असणाऱ्या मुख्य अधिकारी यांना या अश्या सामाजिक कामाला वेळ नाही असच खेदाने म्हणावे लागत आहे. शहरातील लोकांच्या सहनशीलतेचा अंत होण्या आधी ही असे महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे म्हटले अ पावी अशी सूचनाही करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!