*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांना एकता दिव्यांग संस्थेची हाक!*
*जर काही समस्या असतील तर कागदपत्रांसह ४ ऑगस्ट रोजी गोपुरी आश्रम येथे उपस्थित रहा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या समस्या व मागण्या या अजून जैसे थे च आहेत. याला वाचा फोडण्यासाठी एकता दिव्यांग संस्थेने एक पाऊल पुढे जात, दिव्यांग व्यक्तींच्या काही समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठी ४ ऑगस्ट २०२३ रोजी गोपुरी आश्रम वागदे येथे एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दिव्यांग व्यक्तींच्या असलेल्या समस्या जाणून घेऊन प्रशासकीय पातळीवर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी दिव्यांग व्यक्तींनी आपले काही प्रश्न किंवा आपल्या काही समस्या असतील तर ४ ऑगस्ट २0२३ रोजी कणकवली गोपुरी आश्रम, वागदे ( पेट्रोल पंपा समोर ) उपस्थित राहायचे आहे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी दिलेल्या ९८६०७१८९४९ नंबरशी संपर्क साधावा, अस आवाहनही करण्यात आले आहे.